टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि मधुमालती एंटरप्रायझेस यांच्या विद्यमाने ज्येष्ठ अर्थतज्ञ श्री. चंद्रशेखर टिळक यांचे भाषण. अर्थसंकल्प व गुंतवणूक या विषयावर, रविवार दि १७ फेब्रुवारी २०१९ या दिवशी टिळकनगर शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आले होते.
एन. एस. डी. एल चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर व होलटाईम डायरेक्टर श्री. जयेश सुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. अर्थविषयांवरील श्री. चंद्रशेखर टिळक यांचे हे ३००० वे भाषण असल्याने, मंडळाचे कार्याध्यक्ष श्री श्रीकांत पावगी यांनी श्री. चंद्रशेखर टिळक यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. श्री. आबासाहेब पटवारी श्री. माधव जोशी, सौ. स्नेहल दीक्षित, श्री. गिरीष टिळक, सौ धनेश्वर व श्री. जयेश सुळे व श्रीकांत पावगी यांचा श्री. चंद्रशेखर टिळक यांचा गुणगौरव करणारी भाषणे झाली.
आपल्या भाषणात हा अर्थसंकल्प तरुण पिढीच्या भवितव्याला चालना देणारा असल्याचे सांगितले.