आज १५ ऑगस्ट २०१८, भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन टिळकनगर विद्यामंदिर शाळेत उत्साहात साजरा !

18 Jan 2022 15:58:44

vichar1
 
 
 
 
आज *१५ ऑगस्ट २०१८*, भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदीन ! आमच्या टिळकनगर विद्यामंदिरात उत्साहात साजरा झाला. *टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे *कार्याध्यक्ष मा.श्री.श्रीकांत पावगी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.* यावेळी टिळकनगर विभागाचे *नगरसेवक या.श्री. राजन आभाळे, उर्जा फाउंडेशन च्या कार्यकर्त्या व समारंभाच्या प्रमुख वक्त्या मा.सौ.विद्या परांजपे*, संस्थेचे सदस्य डॉ.राजन जोशी, मुख्याध्यापिका सौ.पुणतांबेकर, उपमुख्याध्यापक श्री.राठोड, पर्यवेक्षिका सौ.लीना ओक मॅथ्यू, N.C.C च्या मुली कॅडेट, इतर विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
*N.C.C च्या मुलींनी N.C.C.ऑफिसर सौ.विदुला साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ‌तिरंग्याला शानदार सलामी दिली.
इ.४ ती च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण गीत सादर केले. तर इ.५वी ते ७ वी आणि इ.८वी ते १० वी च्या विद्यार्थीनींनी डोंबिवली जिमखाना स्पर्धेतील प्रथम पुरस्कारप्राप्त समूहगीते सादर केली. यावेळी उपस्थितांना *पर्यावरण रक्षणासंबंधी ध्वनीचित्रफित* दाखविण्यात आली. *मा.सौ.विद्या परांजपे* यांनी *प्लास्टिक -अतीवापर व प्रदूषण -- जनजागृती'* या विषयावर छान सोप्या शब्दात *दृक-श्राव्य* साधनाच्या सहाय्याने *मार्गदर्शन* केले. व *माझा प्लास्टिक कचरा- माझी जबाबदारी'* हा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात त्या यशस्वी झाल्या. मा.श्री.राजन‌ आभाळे व मा.सौ.विद्या परांजपे यांचा शाळेतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. या समारंभात शाळेचे माजी विद्यार्थी श्री. गुरूप्रसाद बर्वे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा व त्यांची पुस्तके शाळेला भेट दिली‌. आणि एल्.आय.सी.कडून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील इ.५ वी ते ९ वी च्या प्रत्येकी एका विद्यार्थ्यास *Student of the year* ची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या ७२ व्या स्वातंत्र्यदिन समारंभाची *सांगता* उपस्थित सर्वांनी *पर्यावरण रक्षणाच्या* घेतलेल्या *प्रतिज्ञेने* झाली. या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.पुणतांबेकर यांनी केले तर श्री. राजन आभाळे व सौ.विद्या परांजपे यांचा परिचय पर्यवेक्षिका सौ.लीना ओक मॅथ्यू यांनी करून दिला. या समारंभाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. प्रज्ञा बापट नी केले.
Powered By Sangraha 9.0