लोकमान्य गुरुकुल विद्यार्थ्यांना आर जे म्युझिकल या वाद्याच्या दुकानाला भेट देण्यासाठी घेऊन जाण्यात आले होते....

दिनांक: 23-Sep-2019


क्षेत्रभेट इयत्ता १ली ते ४थी*...... क्षेत्रभेट उपक्रमाअंतर्गत. शनिवार दिनांक २१/९/१९ रोजी इयत्ता १ ली ते ४ थी विद्यार्थ्यांना आर जे म्युझिकल या वाद्याच्या दुकानाला भेट देण्यासाठी घेऊन जाण्यात आले होते. दुकानांमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले तिथे असणारे सर्व वाद्य मुलांनी अगदी जिज्ञासू वृत्तीने पाहिले इयत्ता तिसरी  चौथीचे विद्यार्थी तर दुकानातून लवकर बाहेरच येत नव्हते. त्यांनी सर्व वाद्यांची  माहिती तिथे असणाऱ्या ज्योती ताई कडून करून घेतली. त्या ताई नी अगदी उत्साहाने मुलांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. मुलांनी तिथे माउथ ऑर्गन, बासरी चे वेगवेगळे प्रकार, हार्मोनियम, ढोल चे वेगळे वेगळे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारच्या झांज, तबला, गिटार, चायनीज ब्लॉक, बुलबुल असे अनेक वाद्य मुलांनी पाहिले. या वाद्यातील काही वाद्य ज्योती हिंगे ताईंनी मुलांना वाजवून दाखवले. वाद्यांना स्वतः हात लावल्यामुळे मुलांना खूपच आनंद झाला.