लोकमान्य गुरुकुलात श्री नितीन दिघे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते....

दिनांक: 21-Sep-2019


व्याख्यान*---- *शुक्रवार दि २० सप्टेंबर*  *वेळ*---- *दुपारी ३ ते ४*  *व्याख्याते*--- *श्री नितीन दिघे*---- शुक्रवार दि २० सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत लोकमान्य  गुरुकुलात श्री नितीन दिघे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते विषय मुलांच्या आवडीचा होता ,तो म्हणजे रोबोटिक्स श्री नितीन दिघे सरानी स्लाईड च्या माध्यमातुन मुलाना या विषयाची ओळख करुन दिली रोबोट म्हणजे काय ?त्याचे वर्गीकरण कसे करतात ? त्याचे विविध भाग कोणते ?अशा प्रकारची माहिती समजावून सांगितली व मुलाना हा विषय सोपा करुन दिला त्यांनी तयार केलेले रोबो ही त्यानी मुलाना दाखवले वेगवेगळ्या क्षेत्रात रोबोटचा होणारा वापरही त्यांनी सांगितला आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित असे *हे व्याख्यान विज्ञानमय   कोशाला पूरक असे होते* .