गुरुकुलाच्या पूर्वप्राथमिक विभागात सुंदर साजिरा श्रावण साजरा झाला........

दिनांक: 11-Sep-2019


सुंदर साजिरा श्रावण.आषाढ अमावस्येला म्हणजे दिव्यांच्या अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते .नवीन महिन्याची म्हणजे  ,सणांच्या महिन्याच्या  स्वागताची तयारी होते आणि येतो सुंदर साजिरा  श्रावण .लोकमान्य गुरुकुलाच्या पूर्वप्राथमिक विभागातही श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत होते आणि सुरुवात होते ती विविध उपक्रमाना* *पहिला सण येतो तो नागपंचमीचा* .सापांचे पर्यावरणातील महत्व मुलाना PPT च्या माध्यमातुन सोप्या भाषेत सांगितले जातात विषारी ,बिनविषारी सापांची चित्रे दाखवुन माहिती सांगितली जाते सणाचा आनंद मुलाना अनुभवता यावा यासाठी मुलांच्या हातावर मेंदी काढली जाते *त्यानंतर येतो तो सण म्हणजे भाऊबहीण  या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण* मुले ताईंच्या मदतीने राखी तयार करतात व एकमेकाना बांधतात. *एका मंगळवारी मुलानी ताईंबरोबर फुगड्या घालुन वेगवेगळे खेळ खेळुन मंगळागौरीच्या खेळांचा आनंद घेतला . *या महिन्यातील महत्वाचा उत्सव म्हणजे जन्माष्टमीचा* गुरुकुलातही ताई मुलाना कृष्णाच्या गोष्टी सांगतात *कृष्ण जन्माल जोडुन येतो तो दहीकाला या दहीकाल्याचा ,दहीहंडीचा उद्देश समजावुन मुलाना दानाचे महत्व सांगितले जाते दहीहंडी या उपक्रमाचे निमित्ताने यावर्षी धान्यहंडीचे आयोजन पूर्वप्राथमिक विभागात करण्यात आले* एक मूठ  मूगडाळ व एक मूठ तांदुळ मुलाना आणायला सांगितले व ते जमा करुन डोंबिवलीतील जाणीव वृध्दसेवाश्रमाला देण्यात आले *असा हा श्रावण महिना संपतो तो कृतज्ञतेचा संस्कार देउन हा दिवस म्हणजे श्रावण अमावस्या* शेतकर्यांनात्यांच्या कामात मुकी सोबत करणाऱ्या बैलांची पूजा करायचा सण बैलपोळा .या सणाची माहिती मुलाना देण्यात आलीं,महत्व सांगण्यात आलें आणि *हाच दिवस मातृदिन म्हणुन साजरा केला जातो आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलांनी ताईंच्या मदतीने आईसाठी शुभेच्छापत्र तयार केले व आईला देउन तिला वंदन केले* तसेच *गुरुकुलात मुलासाठी छान खाऊ करणाऱ्या सौ मधुराताई पित्रे यानाही शुभेच्छापत्र व फुले देउन मुलांनी कृतज्ञता व्यक्त केली* *असा हा विविध नात्यांची गुंफण घालणारा श्रावण महिना गुरुकुलाच्या पूर्वप्राथमिक विभागात चैतन्य निर्माण करतो* .श्रावण महिना संपताच सर्वाना ओढ लागते गणपती बाप्पाच्या पूजनाची .