लोकमान्य गुरुकुल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.....

दिनांक: 23-Aug-2019


टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, लोकमान्य गुरुकुल मध्ये आज दिनांक २३/८/२०१९  रोजी. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेश परिधान केला होता. या वेश्या मध्ये मुलं खूपच सुंदर दिसत होती. दुपारी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या बाल रूपा पासून राजारूपा पर्यंतचा प्रवास गोष्टींच्या रूपाने मुलांनी सादर केला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्म सहावीच्या विद्यार्थ्यांनी लहानपणीचा कृष्ण, सातवीच्या विद्यार्थ्यांनी  सवंगडी मित्र असणारा,  कृष्ण, आठवीच्या विद्यार्थ्यांनी सखा कृष्ण आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी योद्धा कृष्ण म्हणून कसा होता. हे गोष्टीचे रुपाने सादर केले. मुलांनी अगदी उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला. गुरुकुलातील वातावरण कृष्णमय झाले होते.