लोकमान्य गुरुकुलाच्या मुख्याध्यापिका कै.अस्मिता अरविंद कोऱ्हाळकर यांना विनम्र आदरांजली......

दिनांक: 13-Aug-2019


प्रथम पुण्यस्मरण

     टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्री.आशीर्वाद बोंद्रे सर यांनी लोकमान्य गुरुकुलाच्या माजी मुख्याध्यापिका कै.अस्मिता अरविंद कोऱ्हाळकर मॅडम यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यीशी संवाद साधून ताईच्या स्मृतींना उजाळा दिला. 

     तसेच  गुरुकुला मधील  विद्यार्थी आणि शिक्षकांनीही त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी  लोकमान्य गुरुकुलाच्या मुख्याध्यापिका सौ.मयुरा अनगत मॅडम यांनी अस्मिता ताईंच्या फोटोला हार घालून अभिवादन केले. कु.श्रावणी मोहरील व कु.मुक्ता कुवळेकर या विद्यार्थीनींनी महामृत्यूंजय मंत्र म्हणून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी अशी प्रार्थना केली. इ. ४ थी कु.श्रेयस खरे, इ.४ थी कु.मुक्ता मापगावकर, इ. ६ वी.कु.निधी पळसुलेदेसाई या  विद्यार्थ्यांनी ताईबद्दलच्या विविध आठवणी सांगुन त्यांना श्रध्दांजली वाहिली.शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे उभे राहून त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली.