टिळकनगर बालक मंदिरमध्ये आषाढ अमावास्या दीपपूजन साजरा करण्यात आला.....

दिनांक: 31-Jul-2019


दीप सुर्याग्नीरूपस्तं तेजसः तेज उत्तमम 

गृहाणाम मत्कृता पूजा सर्व कामप्रदो भवः 

टिळकनगर बालक मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावषीर्ही आषाढ अमावास्येला दीपपूजन करण्यात आले. मुलांना विविध प्रकारचे दिवे दाखवून दीपपूजनाचे महत्व सांगण्यात आले. दीपपूजनात समई, निरांजन, पणती, पंचारती, कापूर आरती, धूप आरती असे विविध दिवे मांडण्यात आले होते. मुलांकडून दीपपूजन करून घेण्यात आले. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान व रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते सर्व मुलांचा दीपपूजनात उत्साही असा सहभाग होता. दीपपूजनाचा प्रसाद म्हणून मुलांना पौष्टिक लाडूचा खाऊ देण्यात आला.