लोकमान्य गरुकुलाच्या विदयार्थ्यांनी दावडी येथील निसर्गरम्य परिसराला क्षेत्रभेट दिली.....

दिनांक: 22-Jul-2019


क्षेत्रभेट इयत्ता १ ली ते ४ थी...... क्षेत्रभेट उपक्रमाअंतर्गत. लोकमान्य गरुकुलाच्या विदयार्थ्यांनी दावडी येथील निसर्गरम्य परिसराला भेट दिली. मुलांनी गावदेवी मंदिरातील  देवीचे निरीक्षण केले. देवीचे श्लोक म्हटले. मुलांना गावदेवीची माहिती मंगेश दादांनी सांगितली. मुलांना डोंगरावर घेऊन गेल्यावर मुलांनी फुलपाखरे, पक्षी, वेगवेगळे झाड, भेंडीची शेती,  डोंगरातली पायवाट या सर्व गोष्टींचे निरक्षण केले. मुलांनी तळे पहिले. तळ्याचं निरीक्षण करताना मुलांना चतुर दिसले, मुलांनी मासे पहिले. मुलांनी रानवेडी कविता, नेचर इज माय ही  कविता म्हटली. मुलांनी अनेक प्रश्न विचारले. या उपक्रमातून मुलांची निरीक्षण क्षमता वाढण्यास मदत झाली.