लोकमान्य गुरुकुलात गुरुपोर्णिमा उत्सवाचे आयोज.......

दिनांक: 16-Jul-2019


लोकमान्य गुरुकुलात गुरुपोर्णिमा उत्सवाचे आयोजन*.........मंगळवार दि १६जुलै रोजी सकाळी ९ते १० या वेळेत गुरुपोर्णिमेच्या व व्यासपोर्णिमेच्या निमित्ताने *ग्रंथदिंडी व ग्रंथपूजनाचे आयोजन*  करण्यात आले होते *टिळकनगर विद्यामंदिराच्या माजी मुख्याध्यापिका व संस्थेच्या विश्वस्त मा सौ सविता टांकसाळे या प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले*. यावेळी मुलानी गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या श्लोकांचे पठण केले मुलाना मार्गदर्शन करताना टांकसाळे बाईनी मुलाना व्यासांची दोन वचने सांगणारा श्लोक सांगितला व त्याचा अर्थ सांगताना आपण कसे वागले पाहिजे हे सांगितले संत कबीर ,संत तुकाराम यांच्या वचनांमधुन मुलाना शिष्य म्हणुन कसे असावे हे खुप छान समजावुन सांगितले *याच कार्यक्रमात इ ५वी व इ ६वी च्या मुलांच्या राखी विक्री उपक्रमाचा शुभारंभ मा टांकसाळे बाई यांच्या हस्ते झाला*. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम साखळकर याने केले सांस्कृतिक समितीतील सदस्य आर्यन सावंत ,साहिल निमकर ,स्वरुप चुटके ,तनिष्का सावंत ,नहुष कुवळेकर ,मृण्मयी पावसे ,रिदम मेस्त्री ,सोहम रानडे ,राजस खरे ,निधी पळसुलेदेसाई कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी मेहनत घेतली जान्हवीताई व दीप्तीताई यानी मुलाना सहकार्य केले .