लोकमान्य गुरुकुलाच्या इ ५वी ते १० वी च्या मुलांसाठी ज्ञानबोध व्याख्यानमालेचे आयोजन....

दिनांक: 01-Jul-2019


लोकमान्य गुरुकुलाच्या इ ५वी ते १० वी च्या मुलांसाठी ज्ञानबोध व्याख्यानमालेचे आयोजन*--्---- *ज्ञानबोध व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान शनिवार दि २९जून रोजी गुरुकुलात आयोजित करण्यात आले.वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांचे महानायक अर्जुन या विषयावर व्याख्यान झाले*. महाभारतातील अर्जुनाच्या वेगवेगळ्या कथांचा संदर्भ घेउन त्यानी अर्जुन कसा आदर्श होता हे संगितले महाभारतात व्यासानी केलेले अर्जुनाचे वर्णन ताईनी मुलाना सांगितले विद्येचे तेज शरीरावर झळकत असलेला ,शूर ,पराक्रमी पण क्षमाशील ,कोणाबद्दल मत्सर नसलेला ,उत्तम वक्ता ,संगीत नृत्य यात निपुण ,प्रतिभासंपन्न ,गुरुंबद्दल आदर असे विविध गुण अर्जुनात होते आणि मुलानी अशा चरित्रांचा अभ्यास करावा .व्यक्ती म्हणुन मोठे होताना गुणसंपन्न  होण्याचा प्रयत्न करावा ध्येयाने प्रेरित होउन काम करावे असेही त्यानी सांगितले*. मुलानीही ताईना छान प्रश्न विचारले मुलांचे महाभारतातल्या कथांचे वाचन आहे हे दिसुन आले .मनोमय कोशाच्या विकसनावर आधारीत असे हे व्याख्यान मुलाना महाभारताविषयी नवीन माहिती देणारे ठरले.