२१जून या जागतिक योगदिनाचे औचित्य साधून गुरुकुलात संकल्पदिन साजरा करण्यात आला.....

दिनांक: 21-Jun-2019


लोकमान्य गुरुकुलामध्ये  संकल्पदिन साजरा. २१जून या जागतिक योगदिनाचे औचित्य साधून गुरुकुलात संकल्पदिन साजरा करण्यात आला. सकाळी ७ ते ८ या वेळेत इ. ५वी ते १० वी च्या मुलांनी योगासने व सूर्यनमस्काराचा नियमित सराव केला. त्यानंतर ९:००वाजता वर्षारंभ उपासना झाली. वैशालीताईंनी पोथीचे वाचन केले.या .कार्यक्रमाला टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह माननीय श्री. आशीर्वाद बोंद्रे सर आणि माननीय डॉ. महेश ठाकुर सर उपस्थित होते.उपासनेनंतर डॉ. ठाकुर यांनी  ' संकल्पांचे  जीवनातील महत्व'* या विषयी विविध दाखले  देऊन मुलांशी संवाद साधला मुलांचाही खूप छान प्रतिसाद मिळाला. या संवादसत्रानंतर इ. ८वी मध्ये स्कॉलरशीप मिळालेल्या                  कु.आर्या आशीर्वाद बोंद्रे  (जिल्हयात ७ वी), कु.मृण्मयी कोशल पावसे (जिल्हयात ३८वी)                    कु. शुभम श्रीपाद साखळकर ( जिल्हयात ३४ वा)                या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर शिक्षिका ही या उपासना व तदनंतरच्या व्याख्यान सत्रास उपस्थित होत्या. इ १ली ते ४ थी च्या मुलांनाही  संकल्प या विषयी माहिती  देण्यात आली .