लोकमान्य गुरुकुलाच्या इयत्ता ७ वी तील कु.नहुष शैलेश कुवळेकर याचेकम्प्युटर इंटेलिजन्स ऑलिंपियाड स्पर्धेत यश........

दिनांक: 20-Jun-2019


टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुलाच्या  वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. ८ जून  २०१९ रोजी गुरुकुलात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी इयत्ता ७ वी तील कु.नहुष शैलेश कुवळेकर याने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कम्प्युटर इंटेलिजन्स ऑलिंपियाड स्पर्धा २०१८ - १९ या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून ९ वा क्रमांक पटकावला त्याबद्दल  संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. श्रीकांत पावगी सर यांच्या हस्ते त्याचे अभिनंदन व सत्कार करण्यात  आला.