लोकमान्य गुरुकुलच्या पूर्व प्राथमिक विभागाने शनिवार दि २ फेबृवारी रोजी भाजी मंडई चे आयोजन केले होते.....

दिनांक: 04-Feb-2019


मुलाना भाज्यांचा परिचय व्हावा त्यांचे व्यवहार ज्ञान वाढावे एकत्र येउन काम करणे म्हणजे काय याची जाणीव व्हावी या उद्देशाने लोकमान्य गुरुकुलच्या पूर्व प्राथमिक विभागाने शनिवार दि २ फेबृवारी रोजी भाजी मंडई चे आयोजन केले होते. बालवर्गाची मुले भाजी विकत होती आणि मोठा शिशुगट आणि छोटा शिशुगट या वर्गाचे विद्यार्थी आई बाबांबरोबर भाजी खरेदीला आले होते हा उपक्रम उत्तमरित्या पार पडला याचे श्रेय बालवर्गाच्या पालकांकडे जाते वेगवेगळे माहितीचे तक्ते बनवणे  ,मुलांबरोबर भाजी विक्रीला बसणे सगळे  उत्साहाने केले.