लोकमान्य गुरुकुल शाळेमध्ये मराठी भाषा दिन साजरा केला......

दिनांक: 28-Feb-2019


टिळकनगर शिक्षणप्रसारक मंडळ संचालित "लोकमान्‍य गुरूकुल"मध्ये दिनांक २७/०२/१९  रोजी मराठी भाषा दिन साजरा केला. या  कार्यक्रमाला इयत्‍ता पहिली चे पालक श्री गौरव रासने व इयत्‍ता सातवी चे पालक श्री मंगेश चुटके व स्‍थायी प्रतिनीधी सौ कोमल साखळकर आले होते. विशेष म्हणजे या वेळी विद्‍याथ्‍यानी केलेल्‍या कवितांचे सादरीकरण केले.इयत्‍ता पहिली ते नववी च्‍या विद्यार्थ्यांनी मराठी असे आमुची मायबोली हे नाटक सादर केले.यामध्ये अभंग,पोवाडा,भारूड हे कार्यक्रम सादर केले. पु.ल.देशपांडे,ग.दि.माडगूळकर व  सुधीर फडके यांचे जन्‍म शताब्‍दी वर्ष असल्‍याने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.विद्यार्थ्यांनी चितळे मास्‍तरनटसम्राट नाटकातील नाट्‌यछटा सादर केली आहे.   श्री. चुटके सर यांनी  मराठी भाषा प्रदेशानुसार कशी बदलते हे सांगितले,तर श्री. रासने सर  यांनी आपल्या मराठी चा अभिमान बाळगा असे सांगितले तर कोमल ताई नी भाषिक खेळ  शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात हे सांगितले.यामुळे विद्यार्थीच्या आनंदमय मनोमय कोशात भर पडली.