लोकमान्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना श्री संजय भोसले यांच्या घरी विषमुक्त शेती बघण्यासाठी क्षेत्रभेट.....

दिनांक: 08-Nov-2019


सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर  मुलांनी सकाळी योगा केला आणि नास्ता केला आणि सेना निघाली .प्रथम मुले शिक्षक

 श्री संजय भोसले यांच्या घरी विषमुक्त शेती बघण्यासाठी गेली.तिथे त्यांनी शेतीचे विविध प्रकार सांगितले. गोबर गॅसचा प्लांट दाखवला.भोसले यांच्या घरी यावर स्वयंपाक बनवला जातो.त्यानंतर सेना पन्हाळेकाझी लेणी बघण्यासाठी निघाली. दापोली शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक श्री महाजन सर यांनी संपूर्ण लेणींची माहिती विद्यार्थ्यांना दिली.दुपारी पुन्हा निवासस्थानी परत आले. थोड्यावेळाने गव्हे येथे 

डॉ कोपरकर यांच्या नर्सरी ला भेट दिली.तिथे  सौ कोपरकर यांनी तीन प्रकारच्या झाडांची माहिती मुलाना दिली .फुले येणारी झाडे, फळे आणि औषधी वनस्पती  यांची उपयुक्त माहिती दिली.मुलांना विविध प्रकारची झाडे,फुले बघून आनंद झाला.पुन्हा मुले निवासस्थानी रवाना.