लोकमान्य गुरुकुल शाळेमध्ये कविता व्याख्यान .......

दिनांक: 29-Nov-2019


*
व्याख्यान .. कविता तयार होताना .... व्याख्याते . श्री महेश देशपांडे .... दिनांक व वेळ ... शुक्रवार २९ नोव्हेंबर ... सकाळी ८ .०० ते ९ .००* ...शालेय अभ्यासक्रमात मुलाना कविता अभ्यासायला असते मुले कविता पाठ करतात ,त्यावरील प्रश्न उत्तरे लिहितात पण  कविता तयार कशी होते ?त्यासाठी काय आवश्यक आहे ?मुलांना जमेल का ?अशा उद्देशाने आजचे शुक्रवार दि २९ नोव्हेंबरचे गुरुकुलातील व्याख्यान होते टिळकनगर शाळेचे माजी विद्यार्थी   ,कवी श्री महेश देशपांडे याना *कविता तयार होताना* या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते त्यांनी विद्यार्थ्यांशी छान संवाद साधला *प्रत्येक गोष्टीत लय शोधणे ,निरीक्षण करणे ,वाचनाचा ध्यास घेणे ,स्वत:चा विचार वाढवणे ,लेखनाच्या माध्यमातुन व्यक्त होण्याची सवय लावणे .या महत्वाच्या गोष्टी महेश सरांनी मुलांना सांगितल्या .*तनुश्री जोशी व सारंगी भागवत या इ ५वी च्या मुलीनी स्वरचित कविता सादर केली* नेहा प्रजापती व स्वामिनी मुळे या इ ९वी च्या विद्यार्थीनीनी कार्यक्रमाचे नियोजनात मदत केली मनोमय कोशाच्या अनुषंगाने असलेले हे व्याख्यान विज्ञानमय कोशाच्या वृध्दीसाठी होते स्वरचित कविता तयार करताना होणारा आनंद हा निखळ आनंद असतो तो आनंद मुलानी घ्यावा आणि आनंदमय कोश समृध्द व्हावा यासाठीचा हा छोटासा प्रयत्न.