लोकमान्य गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक विभागात बालदिन साजरा करण्यात आला......

दिनांक: 14-Nov-2019


लोकमान्य गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक विभागात बालदिन साजरा करण्यात आला* ...दि १४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन बालदिन म्हणुन साजरा केला जातो लोकमान्य गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक विभागातही आज दि १४नोव्हेंबर रोजी बालदिन साजराकरण्यात आला मुलाना आज वेगवेगळी बालगीते ऐकवली मुलांनीही त्यावर ताल धरला *अंगठ्याचे ठसेकाम करुन मुलांनी आपल्या वर्गात छान चित्र तयार केले मधुराताई पित्रे यानी मुलांसाठी कटलेट आणि नारळाची वडी असा छान खाउ दिला मुलाना प्राण्यांचे मुखवटे दिले ते घालुन मुले बागडत होती *मुलांच्या गडबडीने ,बडबडीने दिवाळीच्या सुट्टीमुळे शांत असलेली शाळा पुन्हा बोलायला लागली* .