लोकमान्य गुरुकुलच्या मुलांचा मातृभूमी परिचय शिबिरात सहभाग.......

दिनांक: 12-Nov-2019


 

 

मातृभूमी परिचय शिबीर १नोव्हे ते ६नोव्हे२०१९ ठिकाण सोलापुर हराळी* .... *लोकमान्य गुरुकुलच्या मुलांनी मातृभूमी परिचय शिबिरा दरम्यान विविध अनुभव घेतले तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मुलाना मिळाले*. डॉ कोटणीस स्मारक येथे श्री गणेश चन्ना यांचे तर भुईकोट बघताना डॉ सत्यव्रत नुलकर यांचे मार्गदर्शन मुलाना मिळाले .मुलानी सिध्देश्वर मंदिरास भेट दिली तिथे प्रार्थना व गीते म्हटली .*ज्ञानप्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आ .स्वर्णलता भिशीकर यानी मुलांना मार्गदर्शन केले* मुलानी सोलापुरच्या विज्ञान केंद्रास भेट दिली यंत्रमाग व त्यानंतर प्रिसिजन कंपनीस भेट दिली .रोहन पुल्ली यांनी सामाजिक उद्योजकता या विषयी मार्गदर्शन केले तर सोलापुर प्रशालेच्या प्राचार्या सुनीताताई चकोत यानी मुलांना मार्गदर्शन केले *हराळीत मुलानी श्रमानुभव घेतला शेतात जाउन सोयाबीन खुडण्याचे काम केले शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात याचा अनुभव घेतला* .हराळी केंद्र प्रमुख अभिजीत दादा कापरे यांनी मुलाना ग्रामविकसन या विषयी माहिती दिली गौरीताई कापरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रमाबद्दल माहिती दिली मुलानी माकणी धरणाला भेट दिली अनिरुद्ददादा पाटील यानी मुलाना विज्ञान प्रयोग दाखवुन त्यातील संकल्पना समजावल्या *मोकळ्या हवेत मुलाना मस्त खेळायला मिळाले* ..हराळीतील प्रकल्प मुलानी बघितले असे अनुभव समृध्द असे मातृभुमी परिचय शिबीर मुलाना खुप आवडले .