लोकमन्य गुरुकुलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवात भोंडला साजरा केला......

दिनांक: 09-Oct-2019


टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमन्य गुरुकुलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवात  भोंडला साजरा केला. लोकमान्य गुरुकुलाच्या १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रत्येक वर्गात सरस्वती पूजन  पार पाडले. यावेळी प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या वह्या पुस्तकांची पूजा केली.

आज विद्यार्थ्यांनी भोंडला साजरा केला. पाटावरती हत्ती ठेवून त्याच्या भोवती विद्यार्थ्यांनी भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मयुरा अनगत यांनी हत्तीची पूजा केली. सौ. जान्हवी जोशी आणि सौ. वैशाली वैशंपायन यांनी भोंडल्याची गाणी म्हटली.

आज विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी, व्यसनमुक्ती, तंबाखू मुक्ती, स्वच्छता या सगळ्यांची शपथ घेतली. आम्ही, आमचे घर, शाळा, परिसर स्वच्छ ठेऊ अशी मनाशी खूणगाठ बांधली. 

"जागर स्त्री शक्तीचा", "जागर नवदुर्गांचा" असा जागर लोकमान्य गुरुकुलमध्ये केला गेला. पूर्व काळापासून आधुनिक काळापर्यंत  अनेक स्त्रियांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने, शक्तीच्या बळावर, भावनेच्या जोरावर अनेक क्षेत्र पादाक्रांत केली. स्त्री अबला नाही तर ती सबला आहे. असे या सर्व स्त्रियांनी आपल्याला जाणवून दिले. आपल्यात एक शक्ती निर्माण केली. म्हणूनच या नवरात्रोत्सवात या स्त्रीशक्तीचा जागर केला गेला. यावेळी गुरुकुलातील इ. १ ली ते १० वी च्या पालक प्रतिनिधिंंना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.

 इ. ३ री ची कस्तुरी नेरुरकर - सुधा मूर्ती

इ. ४ थी ची युक्ता जांभेकर -झाशीची राणी

इ.५ वी ची मुक्त मापगावकर-सावित्रीबाई फुले

इ.६ वी ची   तनुश्री जोशी  - आनंदीबाई जोशी

इ. ७ वी ची निधी पळसुलेदेसाई- सिंधुताई सकपाळ 

इ. ७ वी ची तनिष्का सावंत-राजमाता जिजाऊ

इ. ८ वी ची वैष्णवी पातुरकर - किरण बेदी

इ. ९ वी ची आर्या बोंद्रे -सुषमा स्वराज

इ. १० वी  ची श्रावणी मोहरील - मेरी कोम 

याप्रमाणे  विद्यार्थ्यांनीनी नवदुर्गा लोकमान्य गुरुकुल मध्ये सादर करून त्यांचा जागर केला. यावेळी इ. १ ली ते १० वी  च्या पालक प्रतिनिधींच्या हस्ते या नवदुर्गांचा सत्कार केला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना या कर्तुत्ववान स्त्रियांंची माहिती व कार्य ओळख झाली. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. मयुरा अनगत  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. यश थोरात आणि स्वरूप चुटके यांनी केले तर कु. श्लोक रणपिसे याने पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.