लोकमान्य गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक विभागाच्या बालवर्गाच्या मुलांचे रात्रशिबीर आयोजित करण्यात आले होते....

दिनांक: 22-Oct-2019


लोकमान्य गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक विभागाचा उपक्रम ..... रात्रशिबीर*......   *शुक्रवार दि १८ऑक्टोबर रोजी  पूर्वप्राथमिक विभागाच्या बालवर्गाच्या मुलांचे रात्रशिबीर आयोजित करण्यात आले होते* .. त्या दिवशी मुले  संध्याकाळी साडे सहा वाजता शाळेत आली शाळेत आल्यावर व्यायाम प्रकार प्रार्थना घेउन मुलांचे वेगवेगळे खेळ घेण्यात आले .भाषाखेळ ,मुकाभिनय ,विविविध आकारान्मधुन उद्या मारणे ,गटखेळ ,गटात गप्पा अशा विविध खेळांचा समावेश होता तसेच मुलानी दिवाळीच्या स्वागतासाठी वर्गसजावट करण्यासाठी कागदी पणत्यांची माळ तयार केली. मधुराताई पित्रे यानी मुलांना सुग्रास भोजन दिले शाळेच्या वेळेतला बदल मुलांनी आनंदाने स्विकारला *मनोमय कोशाच्या अनुषंगाने आयोजित केलेला उपक्रम आनंदमय कोशकडे घेउन जाणारा ठरला* .