लोकमान्य गुरुकुल शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.....

दिनांक: 16-Oct-2019


 

 

वाचन प्रेरणा दिन* ..... १५ ऑक्टोबर २०१९..........  *भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा १५ऑक्टोबर हा जन्मदिवस*.. *हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा केला जातो* गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक विभागात वाचन कौशल्य वाढवण्यासाठी,अक्षरओळख पक्की व्हावी ,वाचनाची गोडी लागावी ,या उद्देशाने *शब्द साखळी ,शब्दभेंड्या  ,अक्षर ओळख खेळ* अशा भाषा खेळांचे आयोजन केले जाते *आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने बालवर्गात शब्द वाचन घेतले तसेच वाक्य म्हणजे काय ?ते कसे तयार होते ?हे समजावुन सांगितले त्यांचे वाक्य वाचन घेतले गोष्ट कशी तयार होते या विषयी गप्पा मारल्या*. गोष्टीच्या पुस्तकाची ओळख करुन दिली *मुखपृष्ठ म्हणजे काय ?मलपृष्ठ म्हणजे काय ?पुस्तकात गोष्टी किती आहेत ?ते कसे कळते अशा पध्दतीने पुस्तक वाचनाचा पहिला टप्पा म्हणजे पुस्तक चाळणे व निरिक्षण नोंदवणे हा उपक्रम घेतला*.. अशा पध्दतीने बालवर्गात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .