केडीएमसी जिल्हा ज्युदो स्पर्धेत शाळेचे यशस्वी विद्यार्थी कु.साक्षी बारवे(१०वी) शुभम चव्हाण (९वी) व जयेश सुर्वे (८वी )..

दिनांक: 06-Oct-2018


केडीएमसी जिल्हा ज्युदो स्पर्धेत* शाळेचे यशस्वी विद्यार्थी कु.साक्षी बारवे(१०वी) शुभम चव्हाण (९वी) व जयेश सुर्वे (८वी ) तसेच *कलासंस्कार* च्या *बालनाट्य* स्पर्धेत *द्वितीय *पारितोषिक प्राप्त *आदिबांच्या बेटावर* या नाटकातील सर्व बालकलाकारांचा  कार्याध्यक्ष मा.श्रीकांत पावगी सर व कार्यवाह डॉ.महेश ठाकूर यांनी  शनिवार दिनांक.  ६/१०/२०१८ रोजी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयात गुलाबपुष्प व खाऊ देऊन सन्मान केला. शाळेच्या पर्यवेक्षिका व ज्युदो प्रशिक्षक *लीना ओक मॅथ्यू* , बालनाट्याच्या यशस्वी वेशभूषाकार व शिक्षिका *लीना ठाकूर*, नेपथ्यकार व चित्रकला शिक्षक *श्री. जोगमार्गे* यांनाही सन्मानीत करण्यात आले.