टिळकनगर शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला...

दिनांक: 15-Oct-2018


आज १५ ऑक्टोबर, भारताचे माजी राष्ट्पती कै.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन - भारतात *वाचन प्रेरणा दिवस* म्हणून साजरा केला जातो. डोंबिवलीच्या टिळकनगर विद्यामंदिरात हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा झाला. *शाळेचा माजी विद्यार्थी नीरज पंडीत* (१० वी १९९९ बॅच) शाळेत आला होता. नीरज दैनिक महाराष्ट्र टाईम्स या महाराष्ट्राच्या आघाडीच्या दैनिकात पत्रकार म्हणून विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षण विभागाचे काम पाहतो. नीरज नी डॉ.अनिल काकोडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित *अणुविश्वातील ध्रुवतारा डॉ.अनिल काकोडकर* हे पुस्तक लिहिले आहे.(ज्याचे प्रकाशन खुद् मा. डॉ.काकोडकरांच्या हस्ते झाले) *वाचन प्रेरणा दिवसाचे* औचित्त्य साधत ते पुस्तक शाळेला भेट देण्यासाठी नीरज आज शाळेत आला होता. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्रीकांत पावगी, कार्यवाह डॉ.महेश ठाकूर, मुख्याध्यापिका सौ.पुणतांबेकर, आणि पर्यवेक्षिका सौ.लीना ओक मॅथ्यू यांच्या हाती व इ.७वी च्या विद्यार्थ्यांसमोर एका छोटेखानी समारंभात नीरज नी ही पुस्तके सुपूर्द केली.*वाचाल तर वाचाल आणि वाचाल तर लिहिते व्हाल* - असे नीरज नी विद्यार्थ्यांना सांगितले. नीरज च्या लेखणीतून सदैव उत्तम तेच उमटत राहो, हीच नीरज ला  शुभेच्छा !