अप्रगत विद्यार्थ्यांकरिता उपचारात्मक अध्यापन कसे करावे ? या विषयावर एक कार्यशाळा आयोजित....

दिनांक: 01-Oct-2018


शनिवार दिनांक २९ सप्टेंबर २०१८ रोजी आपल्या शाळेत अप्रगत विद्यार्थ्यांकरिता उपचारात्मक अध्यापन कसे करावे ? या विषयावर एक कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन सौ.मंगला बारवे यांनी केले. सौऊ.स्मिता संभूस व श्री भोये सर यांनी गणित विषयाचे मार्गदर्शन केले.तसेच सौ बारवे व श्री तांबे सर यांनी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शिक्षणविस्तारधिकारी श्रीयुक्त जगताळे साहेब व समन्वयक क.डो.म.पा.च्या सौ. अर्चना जाधव ,श्री.सरदार हे उपस्थित होते.कार्यक्रमास डोंबिवली पूर्व पाथर्ली व आयरे सी. आर.सी तील शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमास १०० ते १२५ शिक्षक उपस्थित होते.