अमृतपुत्र गौरव समारंभ (2016-17)

दिनांक: 22-Aug-2016

अमृतपुत्र गौरव समारंभ 2016-17  

अमृतपुत्र गौरव समारंभ (2016-17)

     डोंबिवली-20 ऑगस्ट 2016 रोजी टिळकनगर विद्या मंदिर शाळेचा भव्य व उत्साहपूर्वक असा अमृतपुत्र गौरव समारंभ यशस्वीरीत्या पार पडला. अमृतपुत्र  गौरव समारंभात वर्षभर मेहनत करून विविध विषयात कौशल्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

     कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पुनतांबेकर मॅडम,संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. सविता टांकसाळे, संस्थेचे कार्यवाहक डॉ. महेश ठाकूर ,डॉ. राजन जोशी तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व भारतीय नौदलाचे कमांडर समीर पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.