जागतिक योग दिवस आपल्या शाळेत

दिनांक: 07-Jan-2016

 


21 जून 2015

प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात व जगाभारात योगसाधनेचे अनन्यसाधारण महत्व आधीच अधोरेखित झालेले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेला योगाभ्यास आता “आंतरराष्ट्रीय योग दिवस” औचित्याने जगभरात अधिकृत रित्या मान्यताप्राप्त झाला आहे.

संयुक्त राष्ट्रानं 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या 177 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या पाठिंब्यासह 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून आता साजरा होणार आहे. मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या आवाहनानुसार दि.२१ जून २०१५ रोजी टिळकनगर शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये योगदिवस साजरा करण्यात आला. या दिवशी रविवार असुनही सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. 

ताण तणावा पासून मुक्ती

रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणार्‍या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा रोज केलेला सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर टाकली जातात.                                           

अंतर्ज्ञानात वाढ

तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगा आणि ध्यान धारणा या मध्ये आहे. तशी ती झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. योगा केल्यामुळे हे बदल आपोआप होत असतात तुम्हाला फक्त याची अनुभूती घ्यायची असते.

एक लक्षात ठेवा, योगा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिचा सराव सतत करत रहा !