व्यवसाय मार्गदर्शन

दिनांक: 07-Jan-2016

व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते. नुकसान सोसायला लागू नये यासाठी व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी व्यवसायाची पूर्वतयारी कशी करावी, आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे. अन्यथा व्यवसायामध्ये मन लावून काम केले जात नाही.

त्याचप्रमाणे व्यवसायाला संधी किती आहे याचा विचारही करणे गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये कोणत्या गोष्टींना सतत मागणी असते, कोणत्या नव्या संधी बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत आहेत, निवडलेल्या संबंधित व्यवसायात व्यवसाय किती संधी आहे याची माहिती घेणेही महत्त्वाचे ठरते. यासाठी आपल्या टिळक नगर विद्या मंदिर शालेत व्यवसाय मार्गदर्शन विभाग कार्यरत आहे.

 या अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केले जाते. दरवर्षी व्यवसाय मार्गदर्शन परिषद व इ. १० वी तील विद्यार्थ्यासाठी समुपदेशन करण्यात येते. व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण पूर्ण केलेले शिक्षक सेवेत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना मानस शास्त्रीय चाचण्या देऊन त्यांना समुपदेशन करण्यात येते.