ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामथ आणि ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे होणार सन्मानित

दिनांक: 25-Jan-2016

डोंबिवली, जानेवारी 25: टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा तर्फे दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठित "तेजस" पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी ज्येष्ठ चित्रकार श्री. वासुदेवजी कामथ (अ. भा. अध्यक्ष, संस्कार भारती) यांची निवड करण्यात आली आहे.
 
ज्येष्ठ शिल्पकार श्री. भाऊसाहेब साठे यांच्या हस्ते रविवार, ३१/०१/१६ रोजी सायं. ७.०० वाजता, टिळकनगर विद्या मंदिराच्या पटांगणात हा पुरस्कार श्री. कामथ यांना प्रदान करण्यात येणार आहे. 
 
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार यंदा ज्येष्ठ लेखक व सावरकर विचारांचे अभ्यासक श्री. शेषरावजी मोरे (अध्यक्ष, जागतिक मराठी साहित्य संमेलन) यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. आबासाहेब पटवारी यांच्या हस्ते सोमवार, दि. ०१/०२/१६ रोजी सायं. ७.०० वाजता टिळकनगर विद्या मंदिराच्या पटांगणात प्रदान करण्यात येणार आहे.
 
या दोन्ही कार्यक्रमाला डोंबिवलीकर नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्री. आशीर्वाद बोंद्रे यांनी केले आहे.