पुरस्कार

दिनांक: 14-Sep-2015

शैक्षणिक प्रगतीबरोबरच डोंबिवली शहराच्या सर्वांगीण सांस्कृतिक सामाजिक विकासात ही आपल्या संस्थेचा अधिकाधिक सहभाग असावा असे जाणून त्यासाठी जे जे करता येईल ते ते करावे असा संस्थेचा मानस होता. डोम्बिवलीकर नागरिक हा बुद्धिमान चतुरस्त्र वाचन करणारा समाजातल्या विविध स्तरांवर विविध विषयात यशस्वीपणे काम करणारा सुजाण नागरिक आहे. त्याची वैचारिक बैठकही तितकीच भक्कम आणि समृद्ध आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन दरवर्षी चार दिवसांची एक व्याख्यानमाला घ्यावी असा विचार पुढे आला. तिला लोकमान्य टिळकांचे नाव द्यावे असे ठरले.ती अव्याहतपणे चालू राहावी म्हणून आर्थिक पाठबळाबरोबरच उत्साही चिरतरुण मनाच्या कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीचीही आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन संस्थेने एक समिती स्थापन केली. नऊजणांच्या प्रथम समितीने टिळक व्याख्यानमालेची पहिली कार्यकारिणी अस्तित्वात आली. व्याख्यानमालेची उद्दिष्टे आणि अपेक्षित परिणाम याचा सखोल विचार करून व्याख्यानमालेचे प्रारूप ठरले. आणि आजपर्यंत ही व्याख्यानमाला सुरु आहे. ही व्याख्यानमाला टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालू असलेने तिचा दर्जा हा समाज प्रबोधानाच्या दृष्टीने अत्युच्य असावा महाराष्ट्रातील सर्व अधिकारी क्षेत्रातील अधिकारी मान्यवर श्रेष्ठींच्या विचारांचा लाभ सर्वाना मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते निश्चित झाले. 

साहित्य अध्यात्म क्रीडा शिक्षण आरोग्य सांस्कृतिक संगीत कला अशा विविध क्षेत्रांपैकी एका क्षेत्राची निवड दरवर्षी करण्याचे ठरले. या क्षेत्रांशी सुसंगत विषयांवर व्याख्यानमाला फुम्फावी आणि वैविध्य जपावे असे सूत्र निश्चित केले गेले. १९८६ ते १९८९ अशी तीन वर्षे तयरी आणि आर्थिक बैठक यावर खर्च झाली.आणि १९९० साली ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी स्प्ताशाब्दीच्या सुमुहूर्तावर लोकमान्य टिळक व्याख्यानमाला सुरु झाली. यातूनच अंगीकृत क्षेत्रात महान कार्य करून समाजमन घडवण्यात ज्यांनी आयुष्य वेचले संस्कृती संवर्धनाचे महनीय कार्य केले अशा कर्मरत तेजस्वी व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा डोंबिवली नागर्वासियान्तर्फे यथोचित सत्कार करावा असे ठरले. सुचविण्यात आलेल्या नावातून “तेजस पुरस्कार”हे कै हेमंत टिळक यांनी सुचविलेले नाव निश्चित झाले.

तेजस पुरस्कार


 १९९० साली ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी सप्तशताब्दीच्या सुमुहूर्तावर “लोकमान्य टिळक व्याख्यानमाला” सुरु झाली. यातूनच अंगीकृत क्षेत्रात महान कार्य करून समाजमन घडवण्यात ज्यांनी आयुष्य वेचले, संस्कृती संवर्धनाचे महनीय कार्य केले अशा कर्मरत तेजस्वी व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा डोंबिवलीकरांतर्फे यथोचित सत्कार करावा असे ठरले. सुचविण्यात आलेल्या नावातून “तेजस पुरस्कार” हे कै. हेमंत टिळक यांनी सुचविलेले नाव निश्चित झाले. १९९० च्या पहिल्या लोकमान्य टिळक व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी हा प्रथम “तेजस पुरस्कार” डॉ. वि. रा. करंदीकर यांना देण्यात आला. ही तेजोमय परंपरा अविरत सुरु आहे.

 

वर्ष

तेजस पुरस्काराचे मानकरी

तेजस पुरस्कार समारंभाचे  अध्यक्ष

दिनांक

१९९०

डॉ. वि. रा. करंदीकर

डॉ. हे. वि. इनामदार

१५/१२/१९९०

१९९१

डॉ. सेतुमाधवराव पगडी

मा. खा. रामभाऊ कापसे

२६/१२/१९९१

१९९२

प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर

मा. वा. शं. आठवले

२८/०३/१९९३

१९९३

श्री. दि. वि. गोखले

मा. नरुभाऊ लिमये

२६/०२/१९९४

१९९४

श्री. कृष्णाजी लक्ष्मण तथा कुशाभाऊ पटवर्धन

मा. वि. वि. चिपळूणकर

०१/०१/१९९५

१९९५

डॉ. राजाभाऊ आणि रेणू दांडेकर

मा. अशोकराव कुकडे

३१/१२/१९९५

१९९६

श्री. ब. ना. जोग

मा. डॉ. व. ल. वष्ट

१२/०१/१९९७

१९९७

मा. डॉ. द. न. गोखले

मा. डॉ. वि. रा. करंदीकर

०४/०१/१९९८

१९९८

मा. गिरीश प्रभुणे

मा. दामूअण्णा दाते

१३/१२/१९९८

१९९९

डॉ. प्र. न. जोशी

श्री. विश्वनाथ नरवणे

०९/०१/२०००

२०००

मा. शं. ना. नवरे

नटश्रेष्ठ चंद्रकांत गोखले

२५/१२/२०००

२००१

मा. दिग्दर्शक राजदत्त तथा श्री दत्तात्रय अंबादास मायाळू

नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर

२५/१२/२००१

२००२

मा. डॉ. व. सी. ताम्हणकर

मा. डॉ. वसंतराव गोवारीकर 

२९/१२/२००२

२००३

डॉ. रवींद्र बापट

डॉ. चंद्रकांत तावरे

१४/१२/२००३

२००४

मा. जयंतराव साळगांवकर

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२६/१२/२००४

२००५

श्रीमती सुहासिनी मांजरेकर

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२५/१२/२००५

२००६

मा. श्री. दामोदर गणेश बापट

प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे

३१/१२/२००६

२००७

मा. डॉ. रघुनाथ माशेलकर

मा. डॉ. विजय भटकर 

०३/०२/२००८

२००८

मा. डॉ. तात्याराव लहाने

प्रा. अशोक प्रधान

०१/०२/२००९

२००९

मा. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

१७/०१/२०१०

२०१०

मा. नमन खानोलकर

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२३/०१/२०११

२०११

मा. श्री. मधुकरराव लिमये

मा. दिग्दर्शक राजदत्त तथा श्री दत्तात्रय अंबादास मायाळू

१९/०३/२०१३

 

२०१२

मा. श्री. चंद्रशेखर टिळक

मा. श्री. आबासाहेब पटवारी

३०/०३/२०१३

 डोंबिवली सेवा पुरस्कार


 

 

 

 

 

 

शिकणे हा मनुष्याचा स्थायी भाव आहे तो ज्या थरात जन्माला येतो ज्या समाजात ज्या राष्ट्रात जन्माला येतो त्या समाज्कडून तो अनेक गोष्टी शिकतो. आणि हे समाजऋण फेडण्याची जेव्हां वेळ येते तेव्हा तो स्वतःवरील भौतिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन समाजोपयोगी कार्ये करतो अशा डोंबिवलीकरांचा सन्मान टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ करते. १९९६ पासून कृताज्ञातापुर्वक “डोंबिवली सेवा पुरस्कार”देऊन अशा विविध क्षेत्रातील डोम्बिवलीकर मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

वर्ष

डोंबिवली सेवा पुरस्काराचे मानकरी

डोंबिवली सेवा पुरस्कार समारंभाचे  अध्यक्ष

दिनांक

१९९६

श्री. रामचंद्र गोविंद तथा रामभाऊ ताम्हाणे

मा. माधवराव काणे

०१/०५/१९९६

१९९७

श्री. म. ना. करंदीकर

शिल्पकार मा. सदाशिव तथा भाऊराव साठे

०२/०३/१९९७

१९९८

मा. मामा देवस्थळी

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२५/०४/१९९८

१९९९

श्री. गुरुदास तांबे

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

०१/०५/१९९९

२०००

डॉ. नीलकंठ ठोसर

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२९/०४/२०००

२००१

श्री. मधुकर नी. जोशी

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२२/०४/२००१

२००२

श्री. ज. ल. तथा तात्या पटवर्धन

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

१३/०४/२००२

२००३

श्री. मुकुंदराव भोईर

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

१५/०४/२००३

२००४

श्री. वामनराव ओक

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

१४/०४/२००४

२००५

कै. सुरेंद्र बाजपेई

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

०९/०७/२००५

२००६

मा. श्री. सुधीर जोगळेकर

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

१४/०४/२००६

२००७

मा. श्री. मधुकरराव चक्रदेव

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

१५/०४/२००७

२००८

मा. डॉ. श्रीमती सुमित्रा टिळक

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

१५/०६/२००८

२००९

श्री. वासुदेवराव भटव सौ. विनिता भट

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

०६/०९/२००९

२०१०

मा. श्री. दिवाकर अनंत घैसास

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

१४/०४/२०१०

२०११

मा. श्री. वसंत आजगावकर

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

 

०५/०२/२०१२

२०१२

मा. श्री. मोहन बापट

मा. श्री. आबासाहेब पटवारी

३०/०३/२०१३

 वीर सावरकर सेवा पुरस्कार


 

 

 

 

 

 

 

टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळाने वीर सावरकर पुरस्कार सुरु केला

 

वर्ष

वीर सावरकर सेवा पुरस्काराचे मानकरी

वीर सावरकर सेवा पुरस्कार समारंभाचे अध्यक्ष

२०००

मा. अवधूत शास्त्री

मा. ब. ना. नवरे

२००१

मा. कर्नल श्याम चव्हाण

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२००२

मा. विक्रम सावरकर

मा. ज. द. जोगळेकर

२००३

मा. अरविंद कुलकर्णी

मा. अवधूत शास्त्री

२००४

मा. वा. ना. उत्पात

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२००५

मा. ज. द. जोगळेकर

श्री. ज. ल. तथा तात्या पटवर्धन

२००७

मा. डॉ. अरविंद गोडबोले

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२००८

मा. श्री. सुधाकर देशपांडे

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२००९

मा. श्री. सुर्यकांत पाठक

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२०११

मा. मिलिंद एकबोटे

मा. आ. डॉ. अशोकराव मोडक

२०१२

मा. श्री. दिलीप करंबेळकर

मा. श्री. आबासाहेब पटवारी